विविध मागण्यांसाठी राज्यभरातील आपले सरकार सेवा केंद्रातील संगणक परिचालक विधान भवनावर धडकले
महागाईच्या काळात या तुटपुंज्या मानधनात जगणेही कठीण असून यावलकर समितीच्या शिफारशीनुसार वेतन देण्यात यावे, अशा विविध मागण्यांसाठी आपले सरकार सेवा केंद्रातील संगणक परिचालक विधान भवनावर धडकले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appग्रामपंचायतच्या सुधारीत आकृतिबंधात लिपिक पदावर कर्मचारी दर्जा देऊन किमान वेतन कायदा 1948 नुसार मासिक वेतन द्यावे, ही मागणीही आपले सरकार सेवा केंद्रातील संगणक परिचालकांनी केली.
मोर्चात मोठ्या संख्येत राज्यभरातून मोठ्या संख्येत सरकार सेवा केंद्रातील संगणक परिचालक सहभागी झाले होते.
यासह विविध मागण्यांसाठी ग्रामपंचायत संगणक परिचालक कर्मचारी संघटनेच्यावतीने विधानभवनावर मोर्चा काढण्यात आला.
या मोर्चाचे नेतृत्व गुणवंत राठोड, जितेंद्र साखरे, सुनीता आमटे, विजय धायजे, राहुल देशमुख आदींनी केले.
संगणक परिचालक किमान वेतन कायदा लागू करावा ही मागणीही यावेळी मोर्चेकऱ्यांनी केली.
या मोर्च्यात राज्यभरातील ग्रामपंचायतींमधील आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पातील संगणक परिचालक आपआपल्या जिल्ह्याचे बॅनर घेऊन मोर्चात सहभागी झाले होते.
आमच्या मागण्यांबाबत सरकार उदासिन असून सरकारने आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी मोर्चेकऱ्यांनी केली,
मोर्च्यात विविध जिल्ह्यातून मोठ्या संख्येत संगणक परिचालक सहभागी झाले होते.
या मागण्यांवर सकारात्मक विचार करु असे आश्वासन यावेळी राज्य सरकारकडून मोर्चेकऱ्यांच्या शिष्टमंडळाला देण्यात आले.