In Pics : जुन्या पेंशनसाठी शिक्षक उतरले रस्त्यावर; महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने मोर्चा
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काढण्यात आलेल्या मोर्च्यात राज्यभरातून मोठ्यासंख्येत शिक्षक सहभागी झाले होते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशिक्षकांचा हा मोर्चा संघटन मंत्री आमदार भगवानराव साळुंखे व शिक्षक आमदार नागो गाणार यांच्या नेतृत्वात काढण्यात आला.
आपल्या मागण्यांसदर्भात शिक्षकांच्या शिष्टमंडळाने शालेय शिक्षण मंत्र्यांची भेट घेतली. शिक्षकांच्या शिष्टमंडळात अध्यक्ष वेणुनाथ विष्णू कडू, सरकार्यवाह नरेंद्र वातकर. महिला आघाडी प्रमुख पूजा चौधरी, किरण पाटील, भगवान साळुंके यांचा समावेश होता.
शिक्षक, कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना लागू करावी ही मुख्य मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आली.
उच्च माध्यमिक शाळांना वाढीव पदांना मान्यता अनुदान द्या ही मागणीही यावेळी करण्यात आली.
शाळांमधये शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे त्वरित भरण्यात यावी ही मागणीही शिक्षकांनी घोषणांद्वारे केली.
उच्च माध्यमिक शाळांना वाढीव पदांना मान्यता अनुदान द्या, यासह आदी मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने मोर्चा काढण्यात आला.
शासनातर्फे शिक्षकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने भविष्यात याची किंमत सरकारला मोजावी लागणार असल्याचा इशाराही यावेळी मोर्चेकऱ्यांनी दिले.
आंदोलनात महिला शिक्षकांचीही संख्या लक्षणीय होती.