PHOTOS : 'हेरिटेज वॉक'मध्ये नागपूरकरांनी जाणून घेतला शहराचा इतिहास
आज, रविवारी नागपुर@2025 आणि मनपातर्फे नागरिकांना आपल्या ऐतिहासिक वारशाची जाणीव करून देणे, वारसा स्थळांची स्वच्छता आणि जतन करणे या उद्देशाने 'हेरिटेज वॉक'चे आयोजन केले होते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयावेळी मोठ्या संख्येत नागरिक सहभागी झाल्याची माहिती मल्हार देशपांडे यांनी दिली.
महाल येथील रुख्मिणी मंदिराचा इतिहासही यावेळी नागरिकांनी जाणून घेतला.
यामध्ये महाल येथील सिनिअर भोसला पॅलेसचाही समावेश होता.
आज भेट दिलेल्या विविध स्थळांमध्ये डीडी नगर विद्यालय, पाताळेश्वर द्वार, सिनिअर भोसला पॅलेस, रुख्मिणी मंदिर, हनुमान खिडची येथे भेट दिली.
सकाळी आयोजित या 'हेरिटेज वॉक'मध्ये शहरातील विविध पाच ऐतिहासिक स्थळांची माहिती देण्यात आली.
रुक्मिणी मंदिराच्या स्वच्छतेसाठी मागील दोन दिवसांत मनपाच्या पथकाने परिश्रम घेतले
'हेरिटेज वॉक' दरम्यान बैठक या तरुणांच्या ग्रुपतर्फे सादरीकरण करण्यात आले.
यावेळी 'बासुरीवाला' या ग्रुपतर्फे मनमोहक बासुरी वादनाचा अनुभव सहभागींनी घेतला.
प्रत्येक वारसा स्थळावर त्याचं ऐतिहासिक महत्व पटवून देण्यात आले.
या निःशुल्क 'हेरिटेज वॉक' मालिकेत लवकर इतर ऐतिहासिक स्थळांवरही लवकरच घेऊन जाण्यात येणार आहे.