PHOTO : रस्ता सुरक्षा सप्ताह : अपघातमुक्त नागपूरसाठी जनजागृती रॅली
रस्ता सुरक्षा सप्ताह 2023 अंतर्गत जिल्ह्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन करुन अपघातापासून बचाव करण्यासाठी आवश्यक उपाययोजनेबाबत जनजागृती करण्यात येत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया अंतर्गत आयोजित जनजागृती रॅलीमध्ये मोठ्यासंख्येत विद्यार्थी सहभाही झाले होते.
आरटीओ कार्यालय नागपूर शहर येथे रॅलीला हिरवा झेंडा दाखविण्यात आला.
रस्ता सुरक्षा सप्ताहांतर्गत प्रादेशिक परिवहन कार्यालय, नागपूर व महाराष्ट्र इंजिनिअरिंग कंपनी, एन.सी.सी., नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा प्रबोधन शिबिर आयोजित करण्यात आले.
आज दुपारी रस्ता सुरक्षा सप्ताहाचा समारोप कार्यक्रमापूर्वी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
शिस्तबद्ध पद्धतीने ही रॅली काढण्यात आली.
विविध ठिकाणी रॅलीने नागरिकांमध्ये वाहतूक नियमांबद्दल जनजागृती केली.
रॅलीमध्ये शहरातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी झाले होते.
आरटीओ आणि नागपूर शहर पोलिसांच्या वतीने रॅलीमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केल्यानंतर तरुणांकडून या आवाहनाला चांगला प्रतिसाद लाभला.
रॅलीमध्ये हातात वाहतूक नियमांबद्दल जनजागृती करणारे फलक विद्यार्थ्यांच्या हातात होते.