In Pics : 96वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन; महात्मा गांधी आणि विनोबांना नमन करुन निघाली ग्रंथ दिंडी
महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांच्या विचारांनी प्रगल्भ झालेल्या वर्धा नगरित आज, शुक्रवारी 96व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास परंपरागत ग्रंथ दिंडीने सुरुवात झाली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ, मोझरीच्या विद्यार्थ्यांनी टाळ मृदंगाच्या गजरात 'जय हरी विठ्ठल' असा गजर केला.
ग्रंथ दिंडीचे स्वागत ठिकठिकाणी पुष्पवर्षाव करुन होत होता. संमेलन स्थळावर पोहोचताच साहित्याचा जयघोष झाला.
विशेष म्हणजे, चरख्यावर सूत कातून ग्रंथ दिंडी तयार करण्यात आली. वर्धा जिल्ह्याची परंपरा यातून व्यक्त करण्यात आली.
96व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात साहित्य प्रेमींचा वर्धा नगरीतील उत्साह शिगेला पोहोचला.
ग्रंथ दिंडी संमेलन स्थळ असलेल्या महात्मा गांधी साहित्य नगरी, स्वावलंबी विद्यालयाकडे रवाना झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पोस्ट ऑफिस चौक, सेंट अँटॉनी नॅशनल स्कूल, छत्रपती शिवाजी महाराज चौक अशी ही ग्रंथ दिंडी निघाली.
दिंडीत लिळाचरित्र, श्रीज्ञानेश्वरी, भारताचे संविधान आदी ग्रंथांचा समावेश होता.
ग्रंथ दिंडीमध्ये विठ्ठल-रुखमाई, संत समर्थ रामदास स्वामी, संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, संत एकनाथ, चक्रधर स्वामी, महात्मा गांधी, तुकडोजी महाराज, संत जनाबाई, छत्रपती शिवाजी महाराज, आई जिजाऊ, झांशी ची राणी लक्ष्मीबाई, रझिया सुलताना, मदर टेरेसा आदी महापुरुषांच्या वेशभूषेत विविध शाळांतील विद्यार्थी सहभागी झाले होते.
ग्रंथ दिंडीचे स्वागत ठिकठिकाणी पुष्पवर्षाव करुन होत होता. संमेलन स्थळावर पोहोचताच साहित्याचा जयघोष झाला.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ आणि विदर्भ साहित्य संघाच्या वतीने आयोजित या संमेलनाच्या अनुषंगाने वर्धा नगरीतील नागरिकांचा उत्साह ओसंडून वाहत होता.