In Pics : अशी करतात बॅलेट पेपरवर झालेल्या मतदानाची मतमोजणी
नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघासाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीची मतमोजणी आज पार पडली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयावेळी मतमोजणीसाठी 28 टेबल लावण्यात आले होते.
प्रत्येक टेबलवर पहिल्या फेरीत 1000 बॅलेटपेपर ठेवण्यात आले होते.
प्रत्येक टेबलवर 22 उमेदवारांच्या नावांचे आण एक बॉक्स अवैध मतपत्रिका ठेवण्यासाठी होता.
उमेदवारनिहाय मतपत्रिका वेगळ्या झाल्यावर त्याची मोजणी करण्यात आली.
पहिल्या फेरीनंतर उर्वरित मतपत्रिका मोजण्यात आल्या.
प्रत्येक टेबलवर उमेदवारांचे प्रतिनीधीही होते. त्यांना दाखवून कर्मचाऱ्यांनी सर्व मतपत्रिका वेगळ्या केल्या.
मोजणूपूर्वी निवडणूक निरिक्षक अरुण उन्हाळे आणि निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त डॉ. विजयलक्ष्मी बिदरी यांच्या उपस्थितीत प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली.
प्रत्यक्ष मतमोजणी करतांना उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींना विश्वासात घेऊन काटेकोरपणे प्रक्रिया पार पाडण्याचे प्रयत्न करण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर प्रक्रिया सुरळीत पार पडावी म्हणून पूर्णवेळ उपस्थित होते.
सर्व प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेने नियोजन केले होते.
दुसऱ्या फेरीनंतर निकालासंदर्भातील माहिती निवडणूक आयोगाच्या परवानगीनंतर सादर करण्यात आली.