Photos : नागपूरच्या दीक्षाभूमी येथे कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी 30 बेडच्या कोविड केअर सेंटरची उभारणी
नागपूरच्या प्रसिद्ध दीक्षाभूमी येथे कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी कोविड केयर सेंटर उभारण्यात आलं आहे. आजपासून हे कोविड केअर सेंटर रुग्णांसाठी सुरू करण्यात आलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभन्ते सुरई ससाई यांच्या हस्ते या कोविड केयर सेंटरचे उदघाटन करण्यात आले.
नागपुरातील गरजू व गरीब कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी दीक्षाभूमी स्मारक समिती पुढे सरसावली आहे.
दीक्षाभूमी स्मारक समितीच्या वतीने दीक्षाभूमी परिसरातील यात्री निवासमध्ये 30 बेडचे कोविड केअर सेंटर आजपासून सुरू करण्यात आले आहे.
यात 15 बेड ऑक्सिजनयुक्त व 15 साध्या बेडचा समावेश आहे. महत्वाचे म्हणजे रुग्णालयात असणाऱ्या ऑक्सिजन यंत्रणेसारखी ऑक्सिजन बेडसाठी येथे कायमस्वरूपी केंद्रिय ऑक्सिजन प्रणाली बसवण्यात आली आहे.
यासाठी 1 मे पासून समितीने तयारी सुरू केली होती. हे कोविड केअर सेंटर पूर्णपणे निशुल्क असून रुग्णांच्या उपचाराचा पूर्ण खर्च स्मारक समिती करणार आहे.
मात्र यात महागड्या औषधांचा समावेश नसणार. रुग्णांवर उपचार करण्यासाठी 4 एमडी डॉक्टर व 3 नर्सेस या केयर सेंटरमध्ये 24 तास उपलब्ध राहणार आहेत.
विना लक्षणे व सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांवर येथे उपचार होणार असून रुग्णालयातून सुट्टी झालेल्या ज्या रुग्णांना ऑक्सिजनची गरज असते त्यांनाही येथे दाखल करता येणार आहे.
कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यावर देखील तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी हे कोविड केअर सेंटर तयार राहणार असल्याचे दीक्षाभूमी स्मारक समितीतर्फे सांगण्यात आले आहे.