Photo : जगातील सर्वात मोठ्या विमानांची मुंबई आंतरराष्ट्रीय विमानळावर ग्रँड एन्ट्री
मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर जगातील सर्वात मोठे विमान उतरले आहे. एअरबस बेलुगा' असं या नागरी उपयोगासाठी असणाऱ्या विमानाचं नाव आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appएअरबस कंपनीचे 'ए300-600 एसटी' हे 'बेलुगा' नावे ओळखले जाणारे विमान 51 टन मालवाहू क्षमतेसह जगातील सर्वात मोठे विमान आहे.
'एअरबस बेलुगा' (Airbus Beluga) या विमानाबरोबरच प्रवासी वाहतुकीत जगात सर्वाधिक अत्याधुनिक असलेले 'एम्ब्रेअर ई 192-ई2' (Embraer E192-E2) प्राफिट हंटर हे विमानदेखील मंगळवारी मुंबई विमानतळावर दाखल झाले आहे. या दोन्ही विमानांची मुंबई विमानतळावर पहिली ग्रँड एन्ट्री झाली.
एअरबस बेलुगा या विमानाला अधिकृतपणे Airbus A300-608ST (सुपर ट्रान्सपोर्टर) असे म्हणतात. याला बेलुगा म्हणतात कारण त्याची रचना बेलुगा व्हेल माश्यासारखी आहे.
प्रवासी वाहतुकीत जगात सर्वाधिक अत्याधुनिक असलेले 'एम्ब्रेअर ई 192-ई2' (Embraer E192-E2) प्राफिट हंटर हे विमानदेखील मंगळवारी मुंबई विमानतळावर दाखल झाले आहे.
बेलुगा एअरबस सुपर ट्रान्सपोर्टर विमान जगातील सर्वात मोठे विमान आहे. बेलुगा एअरबसचे पहिले उड्डाण 13 सप्टेंबर 1994 रोजी झाले होते. एअरबसने 1992 ते 1999 दरम्यान अशी केवळ पाच विमाने बनवली आहेत.
बेलुगा एअरबस विमानामध्ये 40 हजार 700 किलो वजन वाहून नेण्याची क्षमता आहे. हे विमान 184.3 फूट लांब आणि 56.7 फूट उंच आहे.
बेलुगा एअरबसचा वेग प्रचंड आहे. या विमानाचा कमाल वेग 864 किलोमीटर प्रति तास आहे. ते एकावेळी जास्तीत जास्त 27 हजार 779 किलोमीटरपर्यंत उड्डाण करू शकते.
अत्यंत वेगळ्या आकारातील हे विमान आहे. एअरबस कंपनीचे 'ए300-600 एसटी' हे 'बेलुगा' नावे ओळखले जाते. खालील भागापेक्षा दुप्पटीने वरचा भाग मोठा आहे.