PHOTO : मुंबईकरांना मनस्ताप; पश्चिम रेल्वे हळूहळू पूर्वपदावर, तांत्रिक बिघाड दुरुस्त
दहिसर ते बोरीवली स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्यानं ऐन कामाला जाण्याच्या वेळी मुंबईकरांचा खोळंबा झाला आहे. तांत्रिक बिघाड दुरूस्त झाल्याची माहिती हाती येत आहे. मात्र वाहतूक अजून पूर्णपणे पूर्ववत झालेली नाही. जलद मार्गावरील लोकलसेवा जवळपास ठप्प झाली आहे. लांब पल्ल्याच्या ट्रेन्सही एकामागे एक उभ्या आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईत पश्चिम रेल्वेची (Western Railway) लोकल (Mumbai Local) वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यामुळे आठवड्याच्या पहिल्या दिवशीच मुंबईकरांना मनस्ताप सहन करावा लागला. ओव्हरहेड वायर तुटल्यानं पश्चिम रेल्वेचा खोळंबा झाल्याची माहिती मिळत आहे.
पश्चिम रेल्वेच्या दहिसर ते बोरीवली रेल्वे स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे. मुंबईकडे येणाऱ्या जलद मार्गावरील लोकलवर परिणाम झाला. दरम्यान, रेल्वे प्रशासनाकडून तात्काळ ओव्हरहेड वायर दुरुस्तीचं काम सुरु करण्यात आलं होतं. दुरुस्ती पूर्ण झाल्याची माहिती मिळत असून हळूहळू पूर्वपदावर येत आहे.
पहाटे साडेपाच वाजता दहिसर ते बोरीवली रेल्वे स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली. तेव्हापासून कोणतीही लोकल जलद मार्गावरुन चर्चगेटच्या दिशेनं सोडण्यात आली नव्हती.
याचाच परिणाम स्लो मार्गावरील वाहतूकीवर झाल्याचंही दिसून आलं. कारण जलद मार्गावरील काही गाड्या स्लो मार्गावर वळवण्यात आल्या होत्या. त्यामुळे अनेक स्थानकांत प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.
चर्चगेट आणि लगतच्या परिसरात अनेक मोठमोठी कार्यालयं आहेत. मुंबई आणि उपनगरांतून अनेक लोक या परिसरात नोकरीसाठी दररोज लोकलनं ये-जा करत असतात. अशातच सकाळच्याच वेळी ही घटना घडल्यामुळे कामावर जाण्यासाठी निघालेल्या अनेक प्रवाशांचा खोळंबा झाला होता.
बराच वेळ लोकल थांबून राहिल्यानं अनेक मुंबईकरांनी ट्रेनमधून उतरुन पायी चालण्यास सुरुवात केली.
दहिसर ते बोरिवली दरम्यान, प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. त्यासोबतच विरार, वसई, नालासोपारा या स्थानकांतही प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती.
दरम्यान, अद्याप लोकल सेवा पूर्ववत झालेली नाही. लोकल सेवा पूर्ववत करण्यासाठी पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांकडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.