PHOTO : 'शिवतीर्थ'वर राज ठाकरेंच्या नातवाचं बारसं, बाळाची पहिली झलक
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे आणि सून मिताली बोरुडे यांना नुकतंच पुत्ररत्नाचा लाभ झाला आहे. या चिमुकल्याचं नावं 'किआन' (Kiaan) असं ठेवण्यात आलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनुकताच या चिमुकल्याचा आज राज ठाकरे यांच्या घरी नामकरण सोहळा पार पडला आहे. या सोहळ्यासाठी केवळ घरातीलच लोकांना आमंत्रित करण्यात आलं.
राज ठाकरे यांचा नातू आणि अमित ठाकरे यांच्या पुत्राचं नाव 'किआन' असं ठेवण्यात आलं आहे. 'किआन' हे हिंदू धर्मातील नाव आहे. या नावाचा अर्थ देवाची कृपा (Grace of God), प्राचीन (Ancient), राजेशाही (Royal) असा आहे. याची रास मिथून असून नक्षत्र मृग आहे.
दरम्यान राज ठाकरे यांच्या नातवाचं नाव काय असणार यावरून अनेक चर्चा रंगल्या होत्या. सोशल मीडियावर यासंदर्भात अनेक चर्चा आणि पोस्टही व्हायरल झाल्या होत्या त्यानंतर आता अखेरीस अमित ठाकरेंच्या पुत्राचा नामकरण सोहळा पार पडला आहे.
चिमुकल्याचा आगमनापासूनच राज ठाकरे यांच्या घरी उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतं आहे. चिमुकल्याच्या आगमनानंतर बाळाचे आजोबा राज ठाकरे आणि त्याच्या पत्नी म्हणजे बाळाच्या आजी शर्मिला यांनी आनंद व्यक्त केला होता. त्यांनी प्रतिक्रिया देत सांगितलं होतं की, 'आजी-आजोबा होण्यासारखं दुसरं कोणतंही सुख नाही.'