PHOTO: देशाच्या संरक्षण विषयक संसदीय समितीची अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिराला भेट; काय आहे खास...
PHOTO: संसदीय समितीची अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिराला भेट; काय आहे खास...
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदेशाच्या संरक्षण विषयक संसदीय स्थायी समितीने आज अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिराला भेट दिली.
यावेळी या समितीचे अध्यक्ष जुआल ओराम यांनी महादेवाला अभिषेक करत विधिवत पूजन केलं.
संरक्षण विषयक संसदीय स्थायी समिती आज अंबरनाथच्या ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये पाहणीसाठी आली होती
ही पाहणी पूर्ण झाल्यानंतर या समितीने अंबरनाथ शहरातील तब्बल 1060 वर्ष जुन्या प्राचीन शिवमंदिराला भेट दिली.
यावेळी समितीचे अध्यक्ष जुआल ओराम आणि समितीचे सदस्य असलेल्या इतर खासदारांनी महादेवाचं विधिवत पूजन केलं.
यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे मंदिर म्हणजे एक ऐतिहासिक ठेवा असल्याचं त्यांनी म्हटलं.
मंदिराची सध्याची अवस्था पाहता या मंदिराचा जिर्णोद्धार करणं गरजेचं असल्याचं मत समितीचे अध्यक्ष जुआल ओराम यांनी व्यक्त केलं.
तर या मंदिर परिसराच्या विकासासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी 350 कोटी रुपयांचा निधी मंजूर करुन आणला आहे.
त्याचा डीपीआर सुद्धा तयार असल्याची माहिती मंदिराचे परंपरागत पुजारी विजय पाटील यांनी दिली.