In Pics : 'विद्यार्थ्यांचा राजा' गणेशोत्सव मंडळामध्ये 'दुसरी बाजू' पथनाट्याचं सादरीकरण, पावसाची जोरदार हजेरी
'विद्यार्थ्यांचा राजा' अशी ख्याती असलेल्या रुईया नाका सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामध्ये 'दुसरी बाजू' या पथनाट्याचं सादरीकरण झालं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपथनाट्य सुरू असताना जोरदार पावसाला सुरुवात झाली पण विद्यार्थ्यांनी त्याची तमा न करता आपलं सादरीकरण सुरू ठेवलं.
विद्यार्थ्यांच्या या जिद्दीचं आणि पुरुषांवर होणाऱ्या अन्याय - अत्याचारांवर परखडपणे भाष्य केल्याबद्दल उपस्थितांनी त्यांचं भरभरून कौतुक केलं.
यंदाच्या पथनाट्य अभियानाचा प्रारंभ चिंचपोकळीच्या चिंतामणी मंडळातून करण्यात आला.
यंदाच्या गणेशोत्सवात रुईया एनएसएस युनिटने 'दुसरी बाजू' या पथनाट्याचं सादरीकरण केलं.
आज भर पावसात जिद्द न सोडता विद्यार्थ्यांनी पथनाट्य केल्याने त्यांचं उपस्थितांनी कौतुक केलं.
मुंबईतील नामांकित रुईया महाविद्यालयाचं एनएसएस युनिट सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असतं.
दरवर्षीप्रमाणे यंदाही रुईयाचं एनएसएस युनिट मुंबईतल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये जाऊन समाजप्रभोधनात्मक पथनाट्य सादर करत आहे.
'दुसरी बाजू' हा यंदाच्या पथनाट्याचा विषय सर्वांचंच लक्ष वेधून घेणारा ठरतो आहे.
रुईयाच्या एनएसएस युनिटने 'दुसरी बाजू' या पथनाट्याच्या माध्यमातून पुरुषांवर होणाऱ्या अन्याय - अत्याचारांवर परखडपणे भाष्य केलं आहे.