PHOTO: मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर निघाली ‘बाप्पाच्या पालखीची’ मिरवणुक; पाहा फोटो!
गणेशोत्सवाची सध्या सर्वत्र धामधूम सुरू आहे. गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी भाविक घरोघरी जात आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदोन वर्षांच्या खंडानंतर यावर्षी पुन्हा एकदा बाप्पाचं आगमन झाल्याने सगळ्यांमध्ये उत्साह आहे.
तब्बल दोन वर्षांच्या कोरोना काळानंतर महाराष्ट्रात ठिकठिकाणी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जातोय.
बाप्पाच्या उत्सवात मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरही असाच मोठा उत्साह पाहायला मिळतोय.
या ठिकाणी अतिशय पारंपरिक पद्धतीने बाप्पांची मिरवणूक निघाली.
गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर, मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाने (CSMIA) उत्सव साजरा करण्यासाठी खास ‘गणपती पालखी’ मिरवणुकीचे आयोजन केले होते.
ढोल, ताशाच्या गजरात ही मिरवणूक निघाली, जी अनेक प्रवाशांसाठी आकर्षणाचा विषय ठरली होता.
या मिरवणुकीत अनेकांनी पारंपारिक वेशभूषा केली होती.
लेझीम खेळणाऱ्या मुलींचं एक पथकही यात सामील झालं होतं. सर्व प्रवाशांना त्यांनी मंत्रमुग्ध केलं.
CSMIA कर्मचाऱ्यांनीही या उत्सवात उत्साहात भाग घेतला होता.