मुंबईच्या अंधेरीतील उड्डाण पुलावर ट्रकला आग, पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी
मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर अंधेरीच्या उड्डाण पुलावर ट्रकला अचानक आग लागली. बोरीवलीला जाणारी एक लेन बंद केल्यामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे.

WEH Truck Fire
1/8
मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर अंधेरीच्या उड्डाण पुलावर ट्रकला अचानक आग लागली.
2/8
बोरीवलीच्या दिशेने जाणारा लेनवर भरधाव वेगाने जात असलेल्या ट्रक पेटला.
3/8
यानंतर पश्चिम द्रुतगती महामार्गावरील बोरिवलीच्या दिशेने जाणारी मार्गिका पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.
4/8
परंतु यामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे.
5/8
एक मार्गिका बंद केल्यामुळे अंधेरी ते सांताक्रूज दरम्यान प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.
6/8
दरम्यान ट्रकला आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.
7/8
अग्निशमन दलाच्या जवानांनी ट्रकला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवलं आहे.
8/8
दरम्यान ट्रकच्या आगीत कोणालाही दुखापत झालेली नाही. आगीचं नेमकं कारण समजू शकलेलं नाही.
Published at : 19 Jul 2023 08:23 AM (IST)