Rain : मुंबईसह ठाण्यात मुसळधार पाऊस, वाहतुकीवर परिणाम
मुंबईत मध्य रात्रीपासून पावसाची संततधार सुरुच आहे. ठिकठिकाणी सखल भागात पाणी साचलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसखल भागात पाणी साचल्यामुळं वाहतुकीवर मोठा परिणाम झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
पावसामुळं रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. मध्य रेल्वे लोकल ट्रेन वाहतूक 10 ते 15 मिनिटे उशिराने धावत आहे. मध्य रेल्वे लोकल ट्रेन वाहतूक 10 ते 15 मिनिटे उशिराने धावत आहे.
या मुसळधार पावसामुळं सांताक्रूझ मुंबई विमानतळाच्या बाहेर एक ते दीड फूट पाणी भरले आहे. त्यामुळं वाहनचालकांनी वाहन चालवताना अडचणी येत आहेत.
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार राज्याच्या काही भागात पाऊस कोसळत आहे. मुंबईसह उपनगरात सध्या जोरदार पाऊस सुरु आहे.
काही ठिकाणी सखल भागात पाणी साचल्यामुळं रस्ते वाहतुकीवर परिणाम झालाय. तर काही ठिकाणी वाहतुक सुरळीत सुरु आहे.
ठाणे जिल्ह्यात देखील सकाळपासूच जोरदार पावसाला सुरुवात झालीय. वंदना आणि स्टेशन रोड परिसरात पाणी साचायला सुरुवात झाली आहे. त्यामुळं काही भागात वाहतुकीवर परिणाम होताना दिसत आहे.
ठाण्यात मागील 24 तासात 83 मिमी पावसाची नोंद झाली आहे. ठाणे महापालिकेच्या नोंदीनुसार, पालिका परिसरात 65 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
रात्रीपासूनच उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळं अनेक सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे.