Paral Truck Fire: परळ ब्रीजवर बर्निंग ट्रकचा थरार; पाहा अंगावर शहारे आणणारे फोटो
अभिषेक मुठाळ
Updated at:
09 Jan 2023 10:21 AM (IST)
1
Paral Truck Fire: आज सकाळी सात वाजताच्या सुमारास मुंबईतील परळ पुलावर एका ट्रकला आग लागली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
चालकानं प्रसंगावधान राखून ट्रकमधून उडी मारल्यानं तो थोडक्यात बचावला.
3
अग्निशमन दलाला याची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी दाखल झालं.
4
यावेळी वाहतूक पोलिसांनी दोन्ही बाजूची वाहतूक काही काळ थांबवली होती.
5
याचवेळी अग्निशमन दलाचा एका जवान तिथूनच जाणारा पाण्याचा टँकर थांबवून आग विझवली
6
अग्निशमन दलाच्या जवाना दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे ट्रकचा बराचसा भाग आगीतून वाचवण्यात यश आलं.
7
आगीत ट्रकच्या केबिनचं मोठं नुकसान झालं आहे.
8
हा ट्रक भिवंडीहून ॲल्युमिनियमचे सामान घेऊन पायधुनीकडे जात असताना ही घटना घडली.
9
या आगीमुळे काहीकाळ परळ पुलावर वाहतूक कोंडी बघायला मिळाली.