Mumbai Local Mega block: मुंबईकरांनो, घराबाहेर पडण्यापूर्वी प्रवासाचं नियोजन करा; आज लोकल मार्गांवर मेगाब्लॉक
Mumbai Local Train Mega block: मध्य रेल्वेच्यावतीने (Central Railway) , रविवारी 8 जानेवारी रोजी मेगाब्लॉक (Mega Block) घेण्यात येणार आहे. या रविवारी असणारा मेगाब्लॉक हा हार्बर ( Harbour line) आणि ट्रान्सहार्बर मार्गांवर ( Trans harbour line) असणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउपनगरीय रेल्वे मार्गावरील रेल्वे रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी 8 जानेवारी 2023 रोजी मध्य रेल्वेचा हार्बर आणि ट्रान्सहार्बर मार्गांवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.
काही लोकल रद्द करण्यात येणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेने दिली आहे.
पश्चिम रेल्वेवर अंधेरी - बोरिवली अप आणि डाऊन जलद मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. रविवारी मध्य रेल्वेच्या मुख्यमार्गावर दिवसा कोणताही मेगाब्लॉक नसणार नाही.
पश्चिम रेल्वेवर अंधेरी ते बोरिवली अप-डाऊन जलद मार्गावर सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकदरम्यान सर्व अप आणि डाऊन जलद गाड्या अंधेरी आणि बोरिवली स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावरून चालवण्यात येणार आहेत.
मध्य रेल्वेच्या ट्रान्स हार्बरवरील ठाणे-वाशी, नेरुळ आणि हार्बरवरील सीएसएमटी-चुनाभट्टी, वांद्रे स्थानकादरम्यान दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक. ब्लॉक कालावधीत या मार्गांवरील लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.
ब्लॉक कालावधीत पनवेल ते कुर्ला (प्लॅटफॉर्म क्रमांक 8) दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील.
मेगाब्लॉकमुळे हार्बर मार्गावरील प्रवाशांना रविवारी 8 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजल्यापासून ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मुख्य मार्गावरून आणि पश्चिम रेल्वे मार्गे प्रवास करण्याची परवानगी असणार आहे.