Potholes : खड्ड्यांविरोधात ठाकरे गटाचं अनोखं आंदोलन, बिग बींच्या प्रतीक्षा बंगल्याबाहेरील खड्ड्यात दिवे लावून निषेध

बिग बी अमिताभ बच्चन यांचा प्रतीक्षा बंगल्याबाहेर ठाकरे गटाकडून खड्ड्यांविरोधात मध्यरात्री अनोखं आंदोलन केलं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
अमिताभ बच्चन यांच्या प्रतीक्षा बंगल्याबाहेर रस्त्यावर दोन ते तीन फुटांचा खड्डा पडला आहे.

या खड्ड्यांमध्ये दिवे लावून मध्यरात्री ठाकरे गटाकडून महापालिकेविरोधत निदर्शन करण्यात आली.
या खड्ड्यात मध्यरात्रीच्या अंधारात वाहन चालकाचा अपघात होऊ नये त्यामुळे ठाकरे गटाकडून जुहू परिसरात खड्ड्यात दिवे लावून आंदोलन करण्यात आलं.
मागील एक आठवड्यापासून ठाकरे गटाकडून अंधेरी पश्चिम परिसर खड्डामुक्त करण्यासाठी खड्ड्यात रांगोळी काढून आणि दिवे लावून निदर्शन सुरु आहेत.
त्याचाच एक भाग म्हणून ठाकरे गटाचे अंधेरी पश्चिम विधानसभा संघटक संजय कदम यांच्या नेतृत्त्वात खड्ड्यात दिवे लावून आंदोलन करण्यात आलं.
चांद्रयान चंद्रावर पोहोचू शकतो मात्र महापालिका खड्डा भरण्यासाठी खड्ड्यांपर्यंत न पोहोचू शकले नाही, असं आरोप ठाकरे गटाने केला.
त्यामुळे आम्ही महापालिकेविरोधात निदर्शन करत असल्याचं ठाकरे गटाने म्हटलं.