KEM Hospital : मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर केईएम रुग्णालयात कामाला वेग
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर मुंबईतील केईएम रुग्णालयात कामाला वेग आला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुख्यमंत्र्यांनी सोमवारी रात्री परळच्या केईएम रुग्णालयाला अचानक भेट देऊन तिथल्या परिस्थितीचा आढावा घेतला होता.
यावेळी त्यांनी रुग्णालयातील सामान्य विभागासह अतिदक्षता विभागात उपचार घेणाऱ्या रुग्णांशी देखील संवाद साधून त्याना मिळत असलेल्या उपचारांची माहिती घेतली.
यावेळी त्यांनी रुग्णालयातील सामान्य विभागासह अतिदक्षता विभागात उपचार घेणाऱ्या रुग्णांशी देखील संवाद साधून त्याना मिळत असलेल्या उपचारांची माहिती घेतली.
तसेच त्यांना कोणत्याही बाबतीत गैरसोय होते अथवा नाही ते देखील जाणून घेतले.
यावेळी केईएम रुग्णालयात सध्या बंद असलेले सहा वॉर्डस पुन्हा सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्री यांनी दिले होते.
त्यानंतर या सहा वॉर्डमधील कामाला तात्काळ सुरुवात झाली आहे.
केईएम रुग्णालय हे मुंबईतील 100 वर्षांहून अधिक जुनं आणि नावाजलेलं रुग्णालय आहे.
त्यामुळे तिथल्या सोयीसुविधा उत्तम दर्जाच्या असाव्यात अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली होती.
केईएम रुग्णालयात सध्या बंद असलेले सहा वॉर्ड्स पुन्हा सुरु झाल्यास 450 अधिक बेडस रुग्णांसाठी उपलब्ध होणार आहेत.
त्यामुळे या रुग्णालयावरील ताण बऱ्याच अंशी कमी होऊन जास्तीत जास्त रुग्णांना उत्तम वैद्यकीय सेवा मिळेल.