Tata Marathon 2023 : मुंबई 'पळाली'! दोन वर्षांनंतर टाटा मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन, मोठ्या संख्येने नागरिकांचा सहभाग
कोरोनानंतर तब्बल दोन वर्षांनी मुंबईत टाटा मॅरेथॉन स्पर्धेचं (Tata Mumbai Marathon) आयोजन करण्यात आलं आहे. (PC:TataMumMarathon)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआज पहाटे 5 वाजून 15 मिनीटांनी टाटा मॅरेथॉन स्पर्धेला सुरूवात झाली आहे. या मॅरेथॉन स्पर्धेत नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतल्याचे पाहायला मिळत आहे. (PC:TataMumMarathon)
या मॅरेथॉनला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक सेलिब्रिटी उपस्थित रहाणार आहेत. (PC:TataMumMarathon)
टाटा मॅरेथॉनमध्ये सुमारे 55,000 स्पर्धक सहभागी होणार आहेत. (PC:TataMumMarathon)
दरम्यान, आजच्या या टाटा मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होण्यासाठी गाड्यांची व्यवस्था देखील करण्यात आली होती. बोरीवलीहून पहाटे 3 वाजून 45 मिनिटांनी लोकल सुटली. (PC:TataMumMarathon)
या स्पर्धेत कोणताही अडथळा येऊ नये म्हणून या मार्गावरील वाहतुकीत काही बदल करण्यात आले आहेत. वाहतूक पर्यायी मार्गानं वळवण्यात आली आहे. आज पहाटे तीन ते 1 वाजून 15 मिनीटांपर्यंत वाहतुकीत हे बदल करण्यात आले आहेत. (PC:TataMumMarathon)
ढोल ताशांच्या गजरात या स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंचे स्वागत करण्यात आलं. यावेळी मोठा उत्साह पाहायला मिळाला. (PC:TataMumMarathon)
हाफ मॅरेथॉनला मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी हिरवा झेंडा दाखवला. (PC:TataMumMarathon)
कोरोनाच्या संकटानंतर तब्बल दोन वर्षानंतर मुंबईमध्ये मॅरेथॉन होत आहेत. त्यामुळे लोकांमध्ये खूप आनंद असल्याचे मत भाजप नेते आशिष शेलार यांनी व्यक्त केले. (PC:TataMumMarathon)
टाटांकडून आयोजित मुंबई मॅरेथॉनमध्ये माहीम इथे हाफ मॅरेथॉन पोलीस कपमध्ये 14 हजार मुंबईकर सहभागी झाले आहेत. (PC:TataMumMarathon)
मुंबई महानगरपालिकेसोबत मुंबई पोलिसांनी आणि आयोजकांनी जागोजागी लोकांसाठी पाण्याची सुविधा केली आहे. तसेच मेडिकलची व्यवस्था देखील केली आहे. (PC:TataMumMarathon)
मुंबईत टाटा मॅरेथॉन स्पर्धेत मोठ्या संख्येनं नागरिकांचा सहभाग या स्पर्धेत पाहायला मिळत आहे. (PC:TataMumMarathon)