Photo : मुंबईसह राज्यात थंडीचा जोर वाढला
राज्यात थंडीचा जोर वाढला आहे. अनेक ठिकाणी तापमानाचा पारा 10 अंशाच्या खाली घसरला आहे. त्यामुळं चांगलीच हुडहुडी वाढली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्यात तापमानाचा पारा घसरला आहे. नेक जिल्ह्यात हुडहुडी वाढल्यानं काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे.
मुंबईत (Mumbai) थंडीचा जोर चांगलाच वाढला आहे. पुढील दोन दिवस तापमानात आणखी घट होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
राज्यातील तापमानात सातत्यानं चढ उतार होत आहे. सध्या राज्यात थंडीचा जोर चांगलाच वाढला आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यात थंडी वाढली आहे.
उत्तर महाराष्ट्रात तापमानात चांगलीच घट झाली आहे. उत्तर महाराष्ट्रात तापमानाचा पारा 8 अंशाच्या खाली गेला आहे.
पश्चिम महाराष्ट्रातही तापमानात चांगलीच घट झाली आहे. त्याचबरोबर मराठवाडा देखील गारठला आहे. तिथेही तापमानाचा पारा 10 अंशाच्या खाली घसरला आहे.
कोकणातही थंडाचा जोर वाढला आहे. बऱ्याच ठिकाणी तापमान 10 अंशाच्या खाली गेलं आहे. त्यामुळं जोराची थंडी पडली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात थंडी वाढली आहे. ग्रामीण भागात तापमानाचा पारा 10 अंशापर्यंत खाली घसरला आहे.
नाशिक जिल्ह्यात 8.8 अंश तापमानाची नोंद झाली आहे.
जळगावमध्येही तापमानाचा पारा चांगलाच घसरला आहे. तिथेही 8 अंश तापमानाची नोंद झाली आहे.