PHOTO : डोंबिवलीत राज्यस्तरीय गुलाब प्रदर्शन सुरु; गुलाबाचे भन्नाट प्रकार पाहून थक्क व्हाल...
मुंबई महानगर प्रदेशातील सर्वात मोठ्या डोंबिवली रोझ फेस्टिवलचे उदघाटन आज सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते डोंबिवलीत झाले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्यातील विविध भागातून आलेल्या गुलाब पुष्प स्पर्धेत वांगणीच्या आशिष मोरे यांच्या मोरे नर्सरीच्या गुलाबांनी गुलाबांचा राजा व गुलाबांची राणी हे दोन्ही पुरस्कार पटकवले.
नामदार रविंद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून सुरु झालेल्या डोंबिवलीकर रोझ फेस्टिवलचे यंदाचे 13 वे वर्ष आहे.
पुणे रोझ फेडरेशनच्या फुलांना राजकुमार तर वांगणीच्या चंद्रकांत मोरे नर्सरीला राजकुमारीचा पुरस्कार मिळाला. गुलाब पुष्प स्पर्धेचे परीक्षण डॉ विकास म्हसकर, बळवंत ठिपसे, रविंद्र भिडे यांनी केले.
रोजच्या धकाधकीच्या जीवनाने त्रस्त झालेल्या समस्त डोंबिवलीकरांसाठी नवीन वर्षाची गोड सुरुवात व्हावी म्हणून गेली डोंबिवली रोझ फेस्टिवल आयोजित करण्यात येत असून १३,१४,१५ जानेवारी रामनगर येथील बालभवन रसिक गुलाबप्रेमींसाठी विनामूल्य असतो. या वर्षी सुमारे हजारावर गुलाब पुष्पे प्रदर्शनात मांडली असून शेकडो रंग, सुवासाची फुले पाहायला मिळतील.
त्याच बरोबर दुरंगी, रेघांची, मिनिएचर स्वरूपातील गुलाब पाहण्यासाठी लोकांनी पहिल्याच दिवशी गर्दी केली. सांगलीच्या पटवर्धन यांची अनेक देशांनी प्रसिद्ध केलेली गुलाब चित्र टपालतिकिटे प्रदर्शनात मांडलेली पाहायला मिळतील अशी माहिती नामदार रविंद्र चव्हाण यांनी दिली.
इंडियन रोझ फेडरेशन ह्या अखिल भारतीय गुलाबप्रेमी संस्थेच्या वतीने महाराष्ट्रातील मोठमोठ्या गुलाब शेती करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना डोंबिवली रोझ फेस्टिवलमध्ये निमंत्रित करण्यात आले असून मुंबई, पुणे, वांगणी, पनवेल, शहापूर, नाशिक येथून प्रदर्शक सहभागी झाले आहेत.
डोंबिवली रोझ फेस्टिवलशी पहिल्या वर्षांपासून निगडित असलेल्या म्हसकर या डॉक्टर दाम्पत्याचा विशेष सत्कार करण्यात आला.
कल्याणच्या सुप्रसिद्ध डॉ विकास म्हसकर व डॉ मेघना म्हसकर यांनी सरळगावच्या बागेत गेली तीन चार दशके हजारो गुलाब पुष्पे जोपासली आहेत
त्याबद्दल गुलाबाच्या एका नवीन संकरित जातील मेघना हे नाव मध्य प्रदेशात झालेल्या रोझ शो मध्ये देण्यात आले. त्यांना मिळालेल्या या सन्मानाबद्दल डोंबिवली रोझ फेस्टिवलमध्ये डॉ मेघना यांना विशेष पुरस्कार देण्यात आला. डोंबिवली रोझ फेस्टिवल रविवार १५ जानेवारी पर्यंत सुरु राहणार आहे.