फार्म्युला ई वर्ल्ड चॅम्पियनशीपच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री म्हणाले, 6 महिन्यांपूर्वी आम्हीही एक रेस केली अन्....
फार्म्युला ई वर्ल्ड चॅम्पियनशीप भारतात हैद्राबाद येथे 11 फेब्रुवारी 2023 रोजी पहिल्यांदा पार पडणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयाच स्पर्धेचा काऊंटडाऊन सोहळा मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे पार पडत आहे.
या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते.
या सोहळ्यात जनरेशन 2 महिंद्रा ही स्पोर्ट्स कार लॉन्च करण्यात आली.
या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ''6 महिन्यांपूर्वी आम्हीही एक रेस केली.''
या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ''6 महिन्यांपूर्वी आम्हीही एक रेस केली.'' ते म्हणाले, मुंबईत पण रेस व्हायला पाहिजे. समृद्धी महामार्ग यासाठी योग्य आहे.
या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, ''मी ऑटो एक्स्पोमध्ये होतो. इलेक्ट्रिक कार हे मिशन आहे, कारण प्रदूषण खूप वाढत आहे. टू व्हीलरमध्ये निर्यात करण्यात आपण पहिले आहोत. गाडी उत्पादनात भारताला पहिल्या क्रमांकावर आणणे हे लक्ष्य.''
गडकरी म्हणाले, महाराष्ट्र राज्याचे समृद्धी महामार्ग बनवला यासाठी अभिनंदन, हा महामार्ग खूप सुंदर आहे. दिल्ली-मुंबई अंतर 12 तास होईल यासाठी रस्ते बनवले जात आहेत.