मुंबईतील नामांकित बँकेच्या कर्मचाऱ्याचा कारनामा, ग्राहकाची 3 कोटींची एफडी तोडून फसवणूक, हाय कोर्टाने बजावली नोटीस!
एबीपी माझा वेबटीम
Updated at:
04 Dec 2024 11:08 AM (IST)
1
मुंबईतील एका नामांकित बँकेत रिलेशनशिप मॅनेजरने एका ग्राहकाची मोठी फसवणूक केली. या कर्मचाऱ्याने ग्राहकाची 3 कोटींची एफडी परस्पर तोडली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
याचिकेत म्हटले आहे की, कस्टमरची रिलेशनशिप मॅनेजरने 3 कोटी रुपयांची एफडी तोडली आणि आणि ती रक्कम बनावट खात्यांमध्ये आणि तेथून तिच्या स्वतःच्या खात्यात हस्तांतरित केली.
3
रिलेशनशिप मॅनेजरने कस्टमरचा विश्वास जिंकला आणि त्यांच्याकडून रिक्त पेपरवर स्वाक्षरी करून घेतली.
4
हे पैसे म्युच्युअल फंड, गोल्ड बॉन्ड इत्यादींमध्ये हस्तांतरित केले जातील यामुळे त्यांना एफडी पेक्षा जास्त व्याजदर यांच्यात होईल असे आश्वासने दिली होती.
5
बँक कर्मचाऱ्यांनी कस्टमरचा मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी पत्ता बदलला असल्या कारणाने कस्टमरला कुठल्याही प्रकारचा बँकेकडून अलर्ट आला नाही.