संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील रणरागिणी; ज्यांनी आंदोलनात दिलं मोठं योगदान
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अनेकांनी योगदान दिले. मुंबईसह राज्यातील विविध भागांमध्ये विशेषत: सीमा भागात संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन जोमाने सुरू होते. आचार्य अत्रे, सेनापती बापट, कॉम्रेड श्रीपाद डांगे, एस. एम. जोशी, प्रबोधनकार ठाकरे, दादासाहेब गायकवाड आदींसह अनेक दिग्गजांच्या नेतृत्वात ही चळवळ सुरू होती. महिलांचाही लक्षणीय सहभाग होता.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकम्युनिस्ट नेत्या अहिल्या रांगणेकर यांना संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या रणरागिणी असं म्हटलं जायचं. आचार्य अत्रे यांनी अहिल्या रांगणेकर यांच्यावर कविता रचत रणरागिणी असे संबोधले होते. महिलांना मोठ्या प्रमाणावर आंदोलनात उतरवण्याचा वाटा अहिल्या रांगणेकर यांचा होता.
ऐतिहासिक वारली आदिवासी उठावाच्या नेत्या गोदावरी परुळेकर यांच्या नेतृत्वात तलासरी, उंबरगाव, डांग आदी गुजरात सीमेवरील भागात संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन करण्यात आले. कॉम्रेड गोदावरी परुळेकर यांच्यामुळे आदिवासींनीदेखील संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत मोठा सहभाग घेतला.
एका बाजूला राजकीय चळवळीत असणाऱ्या महिला संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत सक्रिय होत्या. तर, दुसऱ्या बाजूला दुर्गा भागवत, इस्मत चुगताई यांसारख्या महिला साहित्यिकांनीदेखील संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत योगदान दिले.
कॉम्रेड तारा रेड्डी, कॉम्रेड अहिल्या रांगणेकर यांनी गिरणगाव व मुंबईतील विविध भागांमधील महिलांना आंदोलनात उतरवले. सत्याग्रह,घेराव आदीमध्ये त्यांचा सहभाग लक्षणीय होता.