Coronavirus : रिलायन्स फाऊंडेशनचा मदतीचा हात, मुंबईत बेडस् सह सर्व सुविधाही पुरवणार
रिलायन्स फाऊंडेशनकडून मुंबईत 875 बेडस् नवे उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. एच एन रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलमध्ये 600, वरळतील एनएससीआय मध्ये 100, सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये 45 आयसीयुसह 125 बेडस् तर ट्रायडंट, बिकेसी येथे 100 बेडस् ची नव्यानं उपलब्धता करुन देण्यात आली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमाहितीनुसार, वरळीच्या नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडियामध्ये कोविड रुग्णांसाठी असलेली 650 बेड्सची सुविधा रिलायन्स फाउंडेशनच्या वतीने चालवण्यात येणार आहे. सर एच. एन. रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालय कोरोना रुग्णांसाठींच्या एकूण 650 खाटांचे परिचलन व व्यवस्थापन करेल.
याशिवाय अधिकच्या 100 ICU बेड्सची सुविधा निर्माण करण्यात येणार आहे. 15 मेपासून हे बेड्सच उपलब्ध होतील, अशी माहिती आहे. रिलायंस फाऊंडेशनकडून 500 हून अधिक वैद्यकीय फ्रंटलायनर्स यामध्ये डॉक्टर, नर्स, नॉन मेडिकल स्टाफ यांना सुविधांच्या देखभालीसाठी नेमण्यात आलं आहे.
ICU बेड, क्वारंटाइन वॉर्ड, व्हेंटिलेटर्स, सगळ्या आरोग्य सुविधांची जबाबदारी रिलायन्स फाउंडेशन करणार आहे.
गेल्या वर्षीसुद्धा फाउंडेशनच्या वतीने मुंबई महापालिकेला सहकार्य म्हणून सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये कोविड रुग्णांसाठी खास 225 बेड्सची व्यवस्था करण्यात आली होती. यामध्ये 100 बेड्स आणि 20 ICU बेड्सची जबाबदारी उचलली होती.
यावर्षीही सेव्हन हिल्स हॉस्पिटल आणि NSCI इथल्या कोविड सेंटरमधल्या सर्व कोविड रुग्णांना रिलायन्सच्या वतीने मोफत उपचार देण्यात येणार आहेत, अशी माहिती फाऊंडेशनकडून देण्यात आली आहे.
एनएससीआय आणि सेव्हन हिल्स रुग्णालयातील सर्व कोरोना रुग्णांवर पूर्णपणे मोफत उपचार केले जातील.
वांद्रे-कुर्ला कॅम्प्लेक्स (बीकेसी) येथील द ट्रायडंट हॅटेलमध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार किरकोळ लक्षणे असलेल्या तसेच लक्षणे नसलेल्या रुग्णांसाठी 100 खाटांची सुविधा आहे. ही सुविधेचे व्यवस्थापन आता सर एच. एन. रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालय करेल.
एनएससीआय, सेव्हन हिल्स रुग्णालय आणि बीकेसी येथील द ट्रायडंट येथील अतिदक्षता विभागातील 145 खाटांसह आता सर्व मिळून 875 खाटांचे व्यवस्थापन रिलायन्स फाऊंडेशनमार्फत होईल, अशी माहिती देण्यात आली आहे.
रिलायन्स फाउंडेशनच्या संस्थापक आणि अध्यक्ष नीता अंबानी म्हणाल्या की, कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी रिलायन्स फाउंडेशन कटिबद्ध आहे. आमचे डॉक्टर आणि फ्रंटलाइन वर्कर्स अहोरात्र राबून सेवा पुरवत आहेत. आम्ही सर्वोत्तम वैद्यकीय सेवा पुरवून जीव वाचवण्याचं काम असंच करत राहू.