EXCLUSIVE: लॉकडाऊन काळात सलमान अशी घेतोय पोलीस आणि फ्रंटलाईन वर्कर्सची काळजी
कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये अभिनेता सलमान खान यानं अनेक गरजवंतांना मदतीला हात दिला. बिइंग ह्युमन या त्याच्या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून त्यानं अनेक भुकेलेल्यांना मदतही देऊ केली. आता हाच भाईजान सलमान यंदाच्या वर्षी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पोलीस आणि फ्रंटलाईन वर्कर्सच्या मदतीला धावला असून, लॉकडाऊन काळातही कार्यरत असणाऱ्या कोविड योद्ध्यांसाठी सलमान पुन्हा एकदा मदतीला धावला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App'Being Haangryy' या नावानं सलमानच्या स्वयंसेवी संस्खेचा एक फूड ट्रक सध्या कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या फ्रंटलाईन वर्कर्सना खाण्याचे पदार्थ, चहा, पिण्याचं पाणी पुरवण्याची सेवा देत आहे. मुंबईत वांद्रे ते जुहू आणि वांद्रे ते वरळी या भागात सध्याच्या घडीला ही सेवा पुरवली जात आहे.
गेल्या चार दिवसांपासून सायंकाळी 5 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत मुंबईतील जवळपास 100 ठिकाणांवर पोलीस आणि फ्रंटलाईन वर्कर्सना ही सुविधा पुरवत आहे. सलमान खाननं आणि राहुल कनाल यांच्या माध्यमातून दिली जाणारी ही सेवा स्वागतार्ह असल्याचं म्हणत वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर गणोरे यांनी आनंद व्यक्त केला.
अन्नपुरवठा करणाऱ्या 'Being Haangryy' या फूड ट्रकच्या माध्यमातून मागील वर्षी जवळपास 2 लाख नागरिकांना तांदुळ, डाळी, पीठ, तेल अशा सामग्रीचा 4 महिन्यांपर्यंत पुरवठा केला होता.
मुंबईत सध्याच्या घडीला जोपर्यंत लॉकडाऊन लागू असेल तोपर्यंत पोलीस आणि फ्रंटलाईन वर्कर्सना काहीशी उसंत देत त्यांच्यापर्यंत ही सेवा अविरतपणे पुरवली जाईल असं संस्थेतर्फे सांगण्यात येत आहे.