'अंधेरीचा राजा'च्या विसर्जनावेळी समुद्रात तराफा बोट उलटली अन्...
अंधेरी येथील गणपती विसर्जनावेळी वेसावे येथील समुद्रात तराफा बोट कलंडल्याची घटना रविवारी घडली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया घटनेत एक मुलगी जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
गणेशमूर्तीचे वेसावे गावातील मांडवी गल्लीतील कार्यकर्त्यांनी विधीपूर्वक विसर्जन केले. अंधेरीचा राजा मंडळाच्या गणेशमूर्तीचे विसर्जन अनंत चतुर्दशीनंतर येणाऱ्या संकष्टीला केले जाते.
अंधेरीचा राजा या गणेशोत्सव मंडळाची विसर्जन मिरवणूक शनिवारी सायंकाळी निघाली.
16 तासांनंतर रविवारी मूर्ती वेसावे येथील समुद्रानजीक आणण्यात आली. तेथील तराफा बोटीवर मूर्ती ठेवण्यात आली. सोबत मंडळाचे कार्यकर्तेही होते.
किनाऱ्यापासून तराफा बोट थोडी पुढे गेल्यानंतर बोटीत वजन जास्त झाल्याने ती एका बाजूला कलंडली.
काही जणांनी पोहत किनारा गाठला तर काहींना स्थानिक कोळी बांधवांनी बोटीच्या साह्याने सुखरूप बाहेर काढले. या घटनेत सिद्धी नायक ही मुलगी जखमी झाली.