पहिल्याच 'लता मंगेशकर' पुरस्काराने पंतप्रधान मोदी सन्मानित, पाहा फोटो
गानसम्राज्ञी लतादीदी मंगेशकर यांच्या नावाने पहिला 'लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार' सोहळा आज षण्मुखानंद सभागृहात पार पडला आहे. या पहिल्याच पुरस्कार सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सन्मानित करण्यात आलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appलता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार हा देशसेवा आणि समाज कार्यासाठी दिला जाणारा पुरस्कार आहे. देशाप्रती असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांचे काम आणि सेवा बघून त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
ज्येष्ठ गायिका आशा भोसले, उषा मंगेशकर आणि आदिनाथ मंगेशकर यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. या कार्यक्रमात मंगेशकर कुटुंबीयांसोबत राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, मंत्री सुभाष देसाई उपस्थित होते.
लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत दाखल तेव्हा देवेंद्र फडणवीस, आदित्य ठाकरे, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी पंतप्रधान मोदींचे स्वागत केले.
हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर पंतप्रधान मोदी म्हणाले की, गीत ही एक साधना असून ही एक भावना ही आहे. जे अव्यक्तला व्यक्त करू शकते. संगीत व्यतीत ऊर्जा आणि चेतना निर्माण करते. लतादीदी वयानं आणि कर्मानंही मोठ्या होत्या. लतादीदी सरलतेची प्रतिमूर्ती, सरस्वतीदेवीचं प्रतिरुप होत्या, असं ते म्हणाले आहेत.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, संगीत तुमच्यात शौर्य भरते. संगीत मातृत्व आणि प्रेमाची भावना देऊ शकते. संगीत तुम्हाला देशभक्ती आणि कर्तव्याच्या शिखरावर नेऊ शकते. आपण सर्व भाग्यवान आहोत की संगीताची ही ताकद लता दीदींच्या रूपात आपल्याला पाहायला मिळाली.