PHOTO : निर्बंधमुक्तीनंतर पहिलाच अंगारकी चतुर्थीचा योग, सिद्धीविनायक मंदिरात भक्तांची रिघ
अंगारकी चतुर्थीनिमित्तानं आज मुंबईतील प्रभादेवी येथील सिद्धीविनायक मंदिरात पहाटेपासूनच गणेशभक्तांची गर्दी पाहायला मिळतेय.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appलॉकडाऊनचे नियम शिथिल झाल्यानंतरची ही पहिलीच अंगारकी असल्यामुळे गणेश भक्तांनी आवर्जून सिद्धीविनायकाचं दर्शन घेण्यासाठी उपस्थिती लावली होती
तब्बल दोन वर्षानंतर कोविड निर्बंधमुक्तीनंतर रात्री दीड वाजल्यापासूनच अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमीत्त मुंबईचं सिद्धीविनायक मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी उघडण्यात आलं आहे.
राज्यामध्ये दोन वर्ष कोरोनाचं सावट असल्यामुळे अंगारक संकष्टी चतुर्थीला भाविकांना सिद्धिविनायक गणपती मंदिरात बाप्पाचं ऑनलाईन दर्शन मिळत होतं. मात्र यावर्षी राज्य निर्बंधमुक्त झाल्यामुळे पहिल्यांदा सिद्धिविनायक मंदिरात भाविकांना बाप्पाचं थेट मंदिरात जाऊन दर्शन घेता येणार आहे.
आज अंगारक संकष्टी चतुर्थी निमित्तानं मुंबईसह मुंबईच्या बाहेरूनसुद्धा मोठा संख्येनं भाविकांनी गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी सिद्धिविनायक मंदिरात मध्यरात्रीपासूनच गर्दी केली आहे.
तब्बल दोन वर्षांनंतर भाविकांना अंगारक संकष्टी चतुर्थी निमित्तानं सिद्धिविनायक मंदिरात गणपती बाप्पाचं दर्शन घेता आलं. त्यामुळे भाविकांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं.
भाविकांना दर्शनासाठी काही त्रास होऊ नये म्हणून मध्य रात्रीपासून सिद्धिविनायक मंदिर प्रशासनाचे कर्मचारी आणि मुंबई पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.