PM Modi In Mumbai : वंदे भारत एक्स्प्रेसला पंतप्रधान मोदींनी दाखवला हिरवा झेंडा, पाहा फोटो!
सीएसएमटी ते सोलापूर आणि मुंबई ते शिर्डी दरम्यान या मार्गावर या दोन्ही वंदे भारत एक्स्प्रेस धावणार आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया उद्घाटनानंतर पंतप्रधान मोदी यांनी उपस्थितांना संबोधित केले.
देशातील 17 राज्यांतील 108 जिल्हे वंदे भारत एक्स्प्रेसने जोडले आहेत.
देशात आज नवीन विमानतळ, वंदे भारत एक्सप्रेस आणि मेट्रोचं जाळं वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे.
पायाभूत सुविधांसाठी अर्थसंकल्पात दहा लाख कोटी रूपयांची तरतूद केली आहे. पायाभूत सुविधांमुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल.
मोठ्या गतीनं देशात वंदे भारत एक्स्प्रेस सुरू झाल्या आहेत.
दोन्ही नवीन गाड्या छत्रपती शिवाजी टर्मिनस (सीएसएमटी) येथून सुरू होतील. एक मुंबई-पुणे-सोलापूर मार्गावर धावेल.
दुसरी मुंबई-नाशिक-साई नगर शिर्डी मार्गावर धावेल.
या दोन्ही वंदे भारत ट्रेन मुंबई आणि पुणे या देशातील मोठ्या शहरांना जोडणार आहेत. यामुळे महाराष्ट्रातील पर्यटन आणि तीर्थक्षेत्रांना चालना मिळेल.