Kala Ghoda Festival 2023 : काळाघोडा महोत्सवात शिल्पकलेच्या माध्यमातून संविधानाचा जागर
मुंबईतील सुप्रसिद्ध काला घोडा आर्ट फेस्टिव्हलमध्ये शिल्पकलेच्या माध्यमातून संविधानाचा जागर करण्यात आला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयंदा कोरो इंडियाने प्रथमच आर्ट इंस्टॉलेशनसह सहभाग घेतला असून संविधानिक मूल्यांचा प्रसार करणारे एक मांडणीशिल्प चर्चगेट येथील क्रॉस मैदानात सादर केले आहे.
भारतीय समाजाचं वैविध्य, विविध समूहांचं प्रतिनिधित्व दाखवणारं हे आर्ट इंस्टॉलेशन ‘कोरो इंडिया’ आणि आर्टिस्ट सुमीत पाटील यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आले आहे.
हे शिल्प संविधानिक मूल्यांचं महत्व अधोरेखित करणारं आणि त्यावरील विश्वास दृढ करणारं आहे.
या मांडणीशिल्पाला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून हे फेस्टिवलचं मुख्य आकर्षण ठरत आहे.
कलेच्या माध्यमातून सोप्या पद्धतीने संविधानिक मूल्यं लोकांपर्यंत पोहोचत आहेत. 13 फेब्रुवारीपर्यंत नागरिकांना हे मांडणीशिल्प पाहता येणार आहे.
विविध कलाप्रदर्शनांपर्यंत ज्यांना कधी पोहोचता आलं नाही, त्या वातावरणाचा अनुभव नसलेल्या तळातल्या कार्यकर्त्यांनी - या आर्ट इंस्टॉलेशनकरता जमेल ती वर्गणी दिली आहे, हे मांडणीशिल्पाचं वैशिष्ट्य असल्याचे कोरो इंडियाने सांगितले.
तळातील आवाज कलेच्या माध्यमातून उमटू लागतो, तेव्हा बदलाचे पडसाद उमटतात. त्यामुळे जास्तीजास्त नागरिकांनी हे शिल्प पाहावे आणि येथील कार्यक्रमांत सहभाग घ्यावा, असं आवाहन कोरो इंडियानं केलं आहे.
कोरो इंडिया ही संस्था गेल्या 33 वर्षांपासून सामाजिक समता, न्यायासाठी, संविधानिक मूल्यांसाठी ग्रासरुटवर काम करत आहे.
यावर्षी कलेच्या माध्यमातून संविधानिक मूल्ये रुजवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यासाठी कोरो इंडियाची टीमही काल घोडा आर्ट फेस्टिवलमध्ये उपस्थित राहून लोकांशी संवाद साधत आहे.