PHOTO : उद्धव ठाकरे यांनी जागवल्या बाळासाहेबांच्या आठवणी...
मुंबई विद्यापीठात सुरू असलेल्या बाळासाहेब चित्र आणि चरित्र' या छायाचित्र प्रदर्शनाच्या समारोप कार्यक्रमात आज शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेट दिली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई विद्यापीठामध्ये बॉम्बे न्यूज फोटोग्राफर असोसिएशनच्या वतीने बाळासाहेब ठाकरेंच्या दुर्मिळ फोटोंचं प्रदर्शन भरवण्यात आलं होतं.
मुंबईतील बिएनपीए संघटनेतील फोटोग्राफर्सनी विविध कार्यक्रमावेळी काढलेले फोटोस प्रदर्शन स्थळी लावण्यात आले आहेत.
हे प्रदर्शन पाहण्यासाठी शरद पवार, अदित्य ठाकरे ,संजय राऊत, रोहित पवार, जितेंद्र आव्हाड आणि इतर नेते मंडळी येऊन गेले आहेत.
हे प्रदर्शन 17 ते 19 मे पर्यंत आयोजित करण्यात आले होते.
मात्र त्याचा प्रतिसाद पाहता 21 मे पर्यंत वाढवण्यात आलं.
या प्रदर्शनात विविध फोटोग्राफर्सनी काढलेल्या 1500 छायाचित्रांपैकी 75 निवडक छायाचित्रे प्रदर्शनात लावण्यात आली होती.
या प्रदर्शनाचा आज समारोप झाला. यानिमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या जुन्या आठवणी जागवल्या.
या ठिकाणी शरद पवारांनी भेट दिली आणि बाळासाहेबांच्या आठवणी जागवल्या.
ठाकरे-पवार मैत्रीचा उल्लेख करून आज बाळासाहेब हवे होते, असे उद्गार आदित्य ठाकरे यांनी काढले होते.