Mumbai-Ahmedabad Highway : मेंढवन खिंडी जवळ टँकर अपघात; वायू गळतीने नागरिक भयभीत!
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर मेंढवन खिंडीजवळील उड्डाणपुलावरील धोकादायक वळणावर एक भीषण अपघात झाला. टँकर चालकाचे नियंत्रण सुटल्याने दुभाजक ओलांडून मुंबई वाहिनीवरील टेम्पोला धडकून टँकर रस्त्यावर उलटला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appत्यानंतर अपघातग्रस्त टँकरमधून अमोनिया गॅस गळती सुरू झाली.त्यामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी झाली.
अकरा वाजताच्या सुमारास उड्डाणपुलाच्या मुंबईकडे जाणाऱ्या रस्त्यावरील दुभाजक जेसीबी मशीनच्या साहाय्याने खोदकाम करून काढून टाकल्यानंतर एका बाजूने वाहतूक सुरू करण्यात आली होती.
NDRF च्या जवानांनी न अपघात ग्रस्त टँकरमधील गॅस गळतीची पाहणी केली. अपघात ग्रस्त टँकर पलटी झाल्याने गळतीचे प्रमाण अधिक होत आहे. टँकर क्रेनच्या साहाय्याने उभा केल्यानंतर गॅस गळती रोखण्याच्या उपाययोजना करण्यात येणार असल्याचे सांगितले.
अदानी इलेक्ट्रिक कंपनीचा एक आणि तारापूर अग्निशमन दलाचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले होते.दुपारी एक वाजताच्या सुमारास NDRF चे पथक घटनास्थळी दाखल झाले
दरम्यान दुपारी अडीच वाजताच्या सुमारास ट्रान्सपोर्ट कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी टँकरमधून होणारी गॅस गळतीची दुरुस्ती केल्यानंतर सर्वांनी सुटकेचा श्वास घेतला.
टँकर हटवण्यासाठी घटनास्थळी तारापूर औद्योगिक वसाहतीमधून मोठ्या क्षमतेचा क्रेन देखील दाखल झाल्या होत्या.