Pankaj Udhas Death : सुरेल गायकीने काळजाचा ठाव घेणाऱ्या पंकज उधास यांचे निधन!
आपल्या सुरेल आणि काळजाचा ठाव घेणाऱ्या गायकीने गेली अनेक वर्षे रसिक श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ गजल गायक पंकज उधास (Pankaj Udhas) यांचे सोमवारी दीर्घ आजाराने निधन झाले. (Photo Credit : facebook/pankaj.udhas)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appते 72 वर्षांचे होते. पंकज उधास यांची कन्या नायाब उधास यांनी याबद्दलची माहिती दिली. (Photo Credit : facebook/pankaj.udhas)
पंकज उधास यांच्या जाण्याने भारतीय गझल गायकीच्या क्षेत्रातील एक महान गायक काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना व्यक्त होत आहे. (Photo Credit : PTI)
17 मे 1951 रोजी गुजरातमधील जेतपूर येथे पंकज उधास यांचा जन्म झाला होता. त्यांनी गायलेली अनेक गाणी आणि गझली आजही श्रोत्यांच्या स्मरणात आहेत. (Photo Credit : facebook/pankaj.udhas)
गेल्या काही काळापासून पंकज उधास यांची प्रकृती ठीक नव्हती. अखेर सोमवारी सकाळी ११ वाजता ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मावळली. (Photo Credit : facebook/pankaj.udhas)
पंकज उधास यांच्या निधनाच्या बातमीने त्यांचे चाहते शोकाकूल झाले आहेत. सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांकडून पंकज उधास यांची गाणी आणि त्यांच्या आठवणींना उजाळा दिला जात आहे. (Photo Credit : PTI)
पंकज उधास हे भारतीय गझल गायकीतील प्रतिष्ठित नाव होते. (Photo Credit : facebook/pankaj.udhas)
त्यांच्या अनेक गाण्याने रसिक प्रेक्षकांना भुरळ घातली होती. (Photo Credit : PTI)
मात्र, मितभाषी असलेले पंकज उधास कायमच प्रसिद्धीच्या झोतापासून दूर राहिले. (Photo Credit : facebook/pankaj.udhas)
त्यांच्या जाण्याने संगीत क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. (Photo Credit : PTI)