Mahesh Gaikwad : शिवसेनेचे कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड यांना मिळाला डिस्चार्ज
त्यांच्यावर ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरु होते. आज तब्बल 24 दिवसानंतर महेश गायकवाड यांना डिस्चार्ज मिळाल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. (Photo Credit : Facebook/Maheshdashrathgaikwad)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउल्हासनगर हिल लाईन पोलीस ठाण्यात गणपत गायकवाड यांनी शुक्रवार 2 फेब्रुवारी रोजी महेश गायकवाड आणि सहकारी राहुल पाटील यांच्यावर जमिनीच्या वादावरून एकूण १० गोळ्या झाडल्या होत्या. (Photo Credit : Facebook/Maheshdashrathgaikwad)
त्यापैकी महेश गायकवाड यांच्यावर सहा गोळ्या तर राहुल पाटील यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या होत्या. त्यामुळे दोघांना तातडीने उपचारासाठी ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात हलविण्यात आले होते.(Photo Credit : Facebook/Maheshdashrathgaikwad)
दरम्यान आज त्यांना डिस्चार्ज मिळाला. महेश गायकवाड यांच्या स्वागतासाठी समर्थकांकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. शहरात जागोजागी बॅनर लावण्यात आले आहेत. (Photo Credit : Facebook/Maheshdashrathgaikwad)
महेश गायकवाड यांना रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्यानंतर चात्यांकडून मोठ्या संख्येने ठाणे आणि कल्याण-डोंबिवली या ठिकाणाहून बॅनरबाजी तसेच शक्ती प्रदर्शन होण्याची शक्यता असल्याने कायदा सुव्यवस्था बघता मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे.(Photo Credit : Facebook/Maheshdashrathgaikwad)
महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह इतर नेते मंडळींनी उपचारादरम्यान भेट घेतली होती. (Photo Credit : Facebook/Maheshdashrathgaikwad)
आज संध्याकाळी सहा वाजता महेश गायकवाड यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. महेश गायकवाड हे आज काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Photo Credit : Facebook/Maheshdashrathgaikwad)