PHOTO : वणवा पेटला! नवी मुंबईत डोंगरावर आग, वनसंपदा आगीच्या भक्ष्यस्थानी
नवी मुंबईतील खारघरच्या डोंगरावर काल रात्री वणवा त्यामुळे मोठ्या प्रमाणावर आगीचे लोळ दिसत होते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहा वणवा कशामुळं लागला यासंदर्भात अद्याप कोणतीही माहिती मिळू शकली नाही.
खारघरच्या डोंगरावर सायंकाळी 7.30च्या दरम्यान लागलेली ही आग आता नियंत्रणात आलेली आहे.
रात्री 3 च्या दरम्यान आग नियंत्रणात आली होती. खारघर अग्निशमन विभागाच्या तीन गाड्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कार्यरत होत्या.
खारघरच्या डोंगराला लागूनच अनेक रहिवाशी इमारती असून डोंगराच्या काही भागात अदिवासी पाडे आहेत.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी अशाचप्रकारे माथेरानच्या डोंगरावर वणवा पेटला होता. आणि काल खारघरचा डोंगर वणव्याचा वेढा पडला. त्यामुळं ही आग लागली की लावण्यात आली? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
नवी मुंबईतील खारघरच्या डोंगरावर वणवा पेटला होता.
सुका कचरा आणि गवतामुळं ही आग पसरत गेली. मोठ्या प्रमाणावर आगीचे लोळ दिसत होते.
हा वणवा कशामुळं लागला यासंदर्भात अद्याप कोणतीही माहिती मिळू शकली नाही.
डोंगराला लागूनच अनेक रहिवासी इमारती असून डोंगराच्या काही भागात अदिवासी पाडे देखील आहेत.
या आगीत मोठ्या प्रमाणावर वनसंपदा आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहे.
काही दिवसांपूर्वी माथेरानच्या डोंगरावर वणवा पेटला होता. डोंगरमाथ्यावरच्या माथेरानपासून काही अंतरावर असलेल्या जुम्मापट्टी परिसरात अचानक वणवा लागला.