Holi Guidelines : होळी, धुळवड साजरी करण्याआधी हे नियम वाचा, नाहीतर...
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
16 Mar 2022 03:05 PM (IST)
1
Maharashtra Holi Dhulivandan Guidelines : होळीच्या (Holi 2022) सणाची सर्वत्र लगबग सुरु आहे. कोरोनाचे निर्बंध कमी झाले असले तरी देखील होळी आणि धुलिवंदनासाठी राज्य सरकारनं नवी नियमावली घोषित केली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
हे नियम पाळावेच लागणार आहेत अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आदेश गृह मंत्रालयानं दिले आहेत.
3
रात्री दहाच्या आत होळी करावी. दहाच्या आत होळी पेटवणं बंधनकारक.
4
डीजे लावण्यास बंदी.. डीजे लावल्यास कायदेशीर कारवाई
5
होळी साजरी करताना मद्यपान आणि बीभत्स वर्तन केल्यास कारवाई
6
दहावी आणि बारावीच्या परीक्षा असल्याने लाऊड स्पीकर जोरात लावू नये,जोरात लावल्यास कारवाई
7
कोणत्याही जाती,धर्माच्या भावना दुखावतील अशा घोषणा देऊ नये. धुलवडीच्या दिवशी जबरदस्तीने रंग, पाण्याचे फुगे फेकू नये