Nalasopara News : नालासोपाऱ्यातील सात बेकायदा इमारतींवर बुलडोझर, 50 हून अधिक कुटुंब बेघर; 30 एकर जागेवरील घरे भुईसपाट होणार
नालासोपारा येथे 30 एकर जागेवर उभारलेले बेकायदेशीर अग्रवाल नगर मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर भुईसपाट करण्यात आलं
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appएक घर बांधण्यात माणसाला उभं आयुष्य मेहनत करावी लागते, पण जेव्हा तेच घर आपल्या डोळ्यांसमोर उद्ध्वस्त होतं, तेव्हा ते घर बांधणाऱ्याच्या मनावर काय आघात होत असेल, हे कुणीच सांगू शकतं.
असाच प्रकार नालासोपारा पूर्व अग्रवाल शहरात पाहायला मिळाला. नालासोपाऱ्यातील अवैध अग्रवाल शहरावर बुलडोझरचा चालवत तोडक कारवाई करण्यात आली.
नालासोपारा पूर्व अग्रवाल शहरातील डम्पिंग ग्राऊंड आणि एसटीपी प्लांटच्या आरक्षित जागेवर बांधलेल्या 41 बेकायदा इमारतींवर तोडक कारवाई होणार आहे. गुरुवारी सकाळी सात इमारतींवर महापालिकेकडून बुलडोझर फिरवण्यात आला.
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, ही तोडक कारवाई करण्यात आली. पहिल्याच दिवशी सात इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. यावेळी महापालिकेचे 50 हून अधिक अधिकारी आणि इतर कर्मचारी उपस्थित होते.
पालिकेच्या तोडक कारवाईदरम्यान, काही लोकांना त्यांचे घर सोडण्यास तयार नव्हते, यावेळी पोलिस दल आणि सुरक्षा रक्षकांनी स्थानिकांना घराबाहेर आणलं.
यावेळी स्थानिकांनी विरोधही केला, मात्र प्रशासनासमोर ते हतबल झाल्याचं दिसून आलं.
लोक रडत-रडत घराबाहेर पडले आणि सामान गोळा करत डोळ्यांसमोर त्यांची घरे जमीनदोस्त झालेली पाहत होते.
पहिल्या दिवसाच्या कारवाईत 50 हून अधिक कुटुंबे बेघर झाली आहेत.
image 10
image 11