Mumbai Marathon: मुंबईकर मॅरेथॉनसाठी सज्ज; कसून सराव सुरू, जगभरातून खेळाडू होणार सहभागी
Tata Mumbai Marathon: मुंबईकरांना घड्याळ्याच्या काट्याशी शर्यत ही काही नवी नाही. पण आज मुंबईच्या रस्त्यांवर मुंबईकर मॅरेथॉनच्या तयारीसाठी धावताना दिसले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App15 तारखेला होणाऱ्या मुंबई मॅरेथॉनसाठी मुंबईकरांनी तयारी सुरू केली असून यंदा जगभरातले खेळाडू सहभागी होणार आहेत.
मुंबईकरांचाही मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी कसून सराव सुरू असल्याचं पाहायला मिळालं.
कोरोनानंतर तब्बल 2 वर्षांनी यंदा मुंबई मॅरेथॉन होणार आहे.
मुंबई मॅरेथॉनमध्ये जगभरातून खेळाडू सहभागी होतात.
यावर्षी मुंबई मॅरेथॉनमध्ये मोठ्या संख्येनं लोक सहभागी होण्याची शक्यता आहे.
मुंबई मॅरेथॉनबाबत मुंबईकरांमध्ये उत्साह असून त्यांनी या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी सराव सुरू केला आहे.
रविवारी (8 जानेवारी) सकाळी शेकडो धावपटू बँडस्टँडजवळ सराव करताना दिसले.