Mumbaicha Raja: 1..2..3..4...गणपतीचा जयजयकार; 'मुंबईचा राजा'ची विसर्जन मिरवणूक थाटात, पाहा फोटो
मुंबईचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेल्या गणेश गल्लीतील बाप्पाची विसर्जन मिरवणूक निघाली आहे. गुलालाच्या उधळणीनंतर बाप्पा मार्गस्थ झाले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदहा दिवस बाप्पाची मनोभावे पूजा केल्यानंतर आज जड अंतकरणाने गणेश भक्त आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देत आहेत.
मुंबईच्या राजाची विसर्जन मिरवणूक निघताच भक्तांनी फुलांचा वर्षाव देखील केला.
बाप्पाला निरोप देण्यासाठी लालबाग-परळ परिसरामध्ये मोठा जनसमुदाय लोटला आहे.
ढोल-ताशाच्या गजरामध्ये गाजत वाजत मोठ्या जल्लोषात बाप्पाची विसर्जन मिरवणूक निघाली आहे.
गणेश गल्लीच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी मिरवणूक मार्गावरील जुन्या चाळींतील लोक बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी आतुरतेनं बाहेर उभे आहेत.
बाप्पाला निरोप देण्यासाठी घरांच्या गॅलरीत लोक जमले आहेत.
भक्तिमय वातावरणात तल्लीन झालेलं हे सर्व दृश्य आज मुंबईमध्ये पाहायला मिळत आहे.
लालबाग-परळला गणेशोत्सवाची पंढरी म्हणून ओळखलं जातं. मुंबईतील जुनी आणि प्रसिद्ध गणेश मंडळ मुंबईतील याच परिसरात आहेत. येथूनच आता मुंबईच्या राजाची देखील विसर्जन मिरवणूक निघाली आहे.
ढोल-ताशांच्या तालावर तरुणाईने विसर्जन मिरवणुकीत ठेका धरला आहे.