लालबागच्या राजाची स्वारी निघाली, लालबाग नगरी भारावली; लाडक्या राजाला निरोप देण्यासाठी लोटला जनसागर
लालबाग मार्केटमधून लालबागच्या राजाची स्वारी विसर्जनासाठी मार्गस्थ झाली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appलालबागच्या राजाचा विजय असो... ही शान कुणाची... लालबागच्या राजाची.... अशा जयघोषात लालबागच्या राजाची स्वारी विसर्जनासाठी मार्गस्थ झाली आहे.
लाडक्या राजाला निरोप देण्यासाठी लालबाग-परळमध्ये गणेश भक्तांनी गर्दी केली आहे.
पारंपारिक कोळी नृत्य आणि कोंबडी बाजाच्या तालावर लालबाग मार्केटमधून लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक मार्गस्थ झाली आहे.
लालबागचा राजा लालबाग मार्केटच्या मुख्य प्रवेशद्वारामधून बाहेर पडला आहे.
लालबागचा राजा आता लालबागला एक प्रदक्षिणा घालेल आणि तिथून पुढे श्रॉफ बिल्डिंगच्या दिशेनं मार्गस्थ होईल.
श्रॉफ बिल्डिंगच्या इथे राजा आल्यानंतर त्याच्यावर मानाची पुष्पवृष्टी केली जाईल.
मानाची पुष्पवृष्टी झाल्यानंतर लालबागचा राजा आर्थर रोडच्या दिशेनं मार्गस्थ होईल.
तिथून राजा भायखळ्याहून पुढे भेंडीबाजार, चिराबाजार, दोन टाकी कर दुसऱ्या दिवशी गिरगाव चौपाटीवर पोहोचेल.
तब्बल 20 तासांहून अधिक काळ राजाची विसर्जन मिरवणूक चालते.
अखेर उद्या (शुक्रवारी) सकाळी राजाला भावपूर्ण निरोप दिला जातो.