Mumbai: मुंबईकरांवर पाणी कपातीचे संकट, 30 आणि 31 जानेवारीला पाणीपुरवठा बंद
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई शहरात काही ठिकाणी दोन दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
30 आणि 31 जानेवारीला मुंबईतील काही भागात पाणी कपात करण्यात येणार आहे.
याबाबत मुंबई पालिकेकडून माहिती देण्यात आली आहे.
भांडुप संकुल येथील जलशुद्धीकरण केंद्रास अतिरिक्त 4,000 मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी जोडण्याचे काम महानगरपालिकेद्वारे हाती घेण्यात येणार आहे
त्यामुळे 30 जानेवारीला चोवीस तासांसाठी पश्चिम आणि पूर्व उपनगरांत पाणीपुरवठा खंडित करण्यात येणार आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या 24 विभागांपैकी 12 विभागातील पाणीपुरवठा पूर्णतः बंद असणार आहे.
दोन विभागातील पाणीपुरवठ्यात 25 टक्के कपात करण्यात येणार आहे
पश्चिम उपनगरातील के पूर्व, के पश्चिम, पी दक्षिण, पी उत्तर, आर दक्षिण, आर मध्य, आर उत्तर, एच पूर्व आणि एच पश्चिम या 9 विभागांमधील अनेक परिसरातील पाणीपुरवठा पूर्णपणे खंडित असणार आहे.
पूर्व उपनगरातील एस विभाग, एन विभाग आणि एल विभागातील अनेक भागात देखील पाणीपुरवठा पूर्णपणे खंडित असणार आहे.