लोककलेशी नाळ जोडणारा 'आमोद' लोककलाकार कृष्णाईने जिंकली मनं!
दिनांक १५, २१ आणि २२ जानेवारी २०२२ रोजी त्यांचा आमोद हा उत्सव उत्साहात पार पडला. ह्या सोहळ्यासाठी प्रसिद्ध अभिनेत्री हेमांगी कवी व मधुरा वेलणकर, नामवंत अभिनेते मंदार चांदवडकर, श्रीरंग गोडबोले तसेच नील सालेकर अश्या दिग्गज कलाकारांनी प्रेक्षकांशी संवाद साधला
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआमोद चे हे दहावे वर्ष आहे व नुकतेच २१ तारखेला मंडळाच्या ' पखरण ' ह्या वार्षिक अंकाचे अनावरण करण्यात आले.
त्यांनी मराठी भाषेच्या जतनासाठी जनजागृती सुद्धा केली. आमंत्रितांपैकी काही संत झेवियर्स महाविद्यालयाचेच विद्यार्थी होते.
तुळजापूरच्या लोककलाकार कृष्णाईचं जादुई भारुडाने उपस्थितांची मनं जिंकली
कृष्णाईच्या भारुडाचं गारुड, ठेका धरायला लावणारं ठरलं!
मराठी भाषा बोलणे, लिहणे व तिचा वारसा जपणे किती महत्त्वाचे आहे हे व मराठी कलाकारांना आपण प्रोत्साहन दिले पाहिजे असे आवाहन मधुरा वेलणकर यांनी केले
अन्य कलाकारांनी सुद्धा त्याला मान्यता दिली प्रथमेश बर्गे, रुपाली देसाई, व दिशा देसाई ह्या उमद्या कलाकारांनी आपापली कला सादर करून ह्या सोहळ्याची शान वाढवली.
पखरण २०२२ ह्या अंकाची ह्या वर्षाची संकल्पना 'नाळ'अशी होती. मंडळ नेहमीच उत्सवातून मनोरंजनात्मक पद्धतीने आपल्या संस्कृतीचे जतन करत आले आहे.