Mumbai Accident: मुंबईत भीषण अपघात; तीनजण गंभीर जखमी, डिव्हाडर तोडून गाड्यांची एकमेकांना धडक
Vikhroli Accident News: मुंबईच्या ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास भीषण अपघात झाला.
Mumbai Vikhroli Accident News
1/9
Vikhroli Accident News: मुंबईच्या ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास भीषण अपघात झाला.
2/9
या अपघातात तीनजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या गोदरेज रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
3/9
मिळालेल्या माहितीनुसार, एक स्विफ्ट डिझायर गाडी मुंबईहून ठाण्याकडे जात होती. दुसऱ्या बाजूनं एक रेंज रोव्हर डिस्कव्हरी ठाण्याहून मुंबईच्या दिशेनं जात होती. त्याच दरम्यान स्विफ्ट डिझायरनं दुभाजक तोडून पुलाच्या पलिकडून जाणार्या रेंज रोव्हर डिस्कवरीला धडक दिली.
4/9
एका गाडीनं दुभाजक तोडून दुसऱ्या गाडीला धडक दिल्यामुळेच अपघात झाला.
5/9
या अपघातात दोन्ही वाहनांचं मोठं नुकसान झालं आहे.
6/9
विक्रोळीच्या नारायण गोदे उड्डाण पुलावर कार दुभाजकाला धडकून विरुद्ध दिशेला गेल्यानं दुसऱ्या वाहनांवर धडकली.
7/9
दुभाजक तोडून दुसरीकडे गेलेल्या स्विफ्ट डिझायरचंही नुकसान झालं असून त्यात बसलेले 3 जण गंभीर जखमी झाले आहेत.
8/9
घटनास्थळी उपस्थित लोकांनी पोलिसांच्या मदतीनं तिनही जखमींना रुग्णालयात दाखल केलं आहे.
9/9
सध्या विक्रोळी पोलीस अपघाताच्या कारणाचा तपास करत आहेत.
Published at : 19 Dec 2022 08:30 AM (IST)