Mahavikas Aaghadi Morcha: महाविकास आघाडीच्या मोर्चात महापुरुषांचे पुतळे, पाहा फोटो
छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य राज्यपाल आणि भाजप नेत्यांनी केले होते. त्याविरोधात महाविकास आघाडीच्यावतीने आज मुंबईत मोर्चा आयोजित केला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया मोर्चात शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस यांच्यासह मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, समाजवादी पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष आदी पक्षदेखील सहभागी आहेत.
या मोर्चाची सुरुवात भायखळा येथील रिचर्डसन कंपनीपासून होणार आहे. तर, बोरिबंदर येथील टाईम्स ऑफ इंडिया येथे सभेत रुपांतर होईल.
या सभेच्या ठिकाणी महापुरुषांचे पुतळे ठेवण्यात येणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारुढ पुतळा असणार आहे.
एका ट्रकमधून छत्रपती शिवाजी महाराजांचा हा अश्वारुढ पुतळा आणण्यात आला.
महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचेही पुतळे आहेत.
महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यामागे एका पाटीच्या प्रतिमेवर 'विद्येविना गती गेली....' या पंक्ती आहेत.
छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचादेखील पुतळा सभेच्या ठिकाणी असणार आहे.
राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्यासोबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे.
महाराष्ट्रातील सामाजिक सुधारणा चळवळीत या महापुरुषांचे मोठे योगदान आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात झालेल्या अपमानास्पद वक्तव्याने राज्यात संतापाची लाट उसळली आहे.