Mumbai Rain Updates: मुंबापुरीची चिंबापुरी....
मुंबईसह राज्यातही काही ठिकाणी पावसाने (rain in Maharashtra) दमदार हजेरी लावली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदमदार पावसाने काही जिल्ह्यातील बळीराजा सुखावला. तर, काही ठिकाणी पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. लांजा तालुक्यातील काजळी नदीला पूर आल्याने मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे.
ठाणे जिल्ह्यातही पावसाने चांगली हजेरी लावलीय भिवंडी, अंबरनाथमध्ये पावसामुळे काही ठिकाणी पाणी साचले.
वाहतुकीवरही परिणाम झाला आहे.
सकाळपासूनच मुंबईत पावसाची संततधार सुरु आहे.
विविध ठिकाणी सखल भागात पाणी साचलं आहे.
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार राज्याच्या विविध भागात आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
सध्या राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस (Heavy Rain) पडत आहे. या पावसामुळं काही भागात जनजीवन विस्कळीत झालं आहे.हवामान विभागाकडून पुढील तीन दिवस राज्यात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
कोकणातील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
हवामान विभागाकडून पुढील तीन दिवस राज्यात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर दोन्ही जिल्ह्यांतील सर्व शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.