Mumbai: मुंबईतील 'या' मार्केटमध्ये मिळतात फक्त 1 रुपयांना कानातले; कुठे आहे हे मार्केट? पाहा...
आपल्याकडे प्रत्येक ड्रेसवर मॅचिंग कानातले असावे, अशी प्रत्येक महिलेची इच्छा असते. पण वाढत्या महागाईमुळे आपण त्या भानगडीत पडत नाही. पण, आता काळजी करू नका. कारण तुम्ही मुंबईतील मार्केटमध्ये फक्त 1 रुपयांपासून कानातले खरेदी करू शकता.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईतील प्रसिद्ध भुलेश्वर मार्केटमध्ये फक्त 1 रुपयांना कानातल्याचे जोड मिळतात. या मार्केटमधील जिग्न इंपेक्स या दुकानात 1 ते 25 रुपये या किमतीत हवे तसे कानातले मिळतात.
त्याचबरोबर 12 रुपयांमध्ये ब्रेसलेट आणि 15 रुपयांमध्ये हातातले कडे किंवा बांगड्या येथे खरेदी करता येतात.
महागाईमुळे प्रत्येक वस्तूची किंमत वाढली आहे. असं असलं तरी मुंबईतील भुलेश्वर मार्केटमध्ये होलसेल दरात वेगवेगळे दागिने खरेदी करता येतात.
विविध प्रकारचे कानातल्याचे जोड तुम्हाला या मार्केटमध्ये उपलब्ध होतील.
अनेक मुंबईकर लग्नाचा बस्ता इथेच खरेदी करतात. दैनंदिन वापरातील दागिने आणि कपडेही इथे स्वस्त दरात मिळतात. पण, अवघ्या 1 रुपयांमध्ये कानातलं मिळाणारं हे मार्केट मुंबईतील सर्वसामान्यांसाठी नक्कीच सोयीचं आहे.
5 रुपयांपासून सुरू होणारे मोठे कानातल्याचे जोड देखील या मार्केटमध्ये सहज उपलब्ध होतात.