Mumbai Rain Update : मुंबईत चारी बाजूंनी विजांचा कडकडाट, पश्चिम उपनगरात तुफान पाऊस, वाऱ्यामुळे बॅनर कोसळले
Mumbai Rain Update : मुंबईच्या पश्चिम उपनगरात मागील अर्धा तासापासून परतीच्या पावसाला जोरदार सुरुवात झाली आहे.

Photo Credit - abp majha reporter
1/9
पश्चिम उपनगरात अनेक भागात ढगांच्या गडगटाटासह मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. अंधेरी,जोगेश्वरी,गोरेगाव मालाड,कांदिवली,बोरिवली,दहिसर,विलेपार्ले सांताक्रुझ,वांद्रे या सर्व परिसरामध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे.
2/9
काही वेळ जर असाच जोरदार पाऊस सुरू राहिला तर पश्चिम उपनगरात सखल भागांमध्ये पाणी भरायला सुरुवात होणार आहे.
3/9
मुंबई सोबतच मुंबई पूर्व उपनगरे, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज व्यक्त केला जातोय.
4/9
पुढील 120 मिनिटांपर्यंत वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी पाहायला मिळू शकतात.
5/9
परतीच्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलंय. बोरिवलीतही मुसळधार पावसाला सुरुवात झालीये.
6/9
काही ठिकाणी नवरात्रीच्या शुभेच्छा देण्यासाठी लावण्यात आलेले बॅनर कोसळले आहेत.
7/9
भिवंडी शहरात व तालुक्यात विजाच्या कडकडात ढगाच्या गडगडात जोरदार पाऊस पडतोय.
8/9
परतीच्या पावसाने भिवंडी शहर व तालुक्यात विजांच्या कडकडात ढगांच्या गडगडात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आहे.
9/9
संध्याकाळच्या सुमारास परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली असून यावेळी नागरिकांची एकच तारांबळ उडाली असून उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळालाय.
Published at : 10 Oct 2024 10:43 PM (IST)