Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
अशीही श्रद्धांजली... जो पुरस्कार प्रदान केला, त्या पुरस्कारालाच आता रतन टाटांचे नाव, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
मला शालेय जीवनापासून वाटायचे की रतन टाटा याना भेटावं, पण गेल्यावर्षी जो पुरस्कार जाहीर झालं, त्याचे पत्र देण्यासाठी मी गेलो होतो, असे उदय सामंत यांनी सांगितले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहाराष्ट्र शासनाच्या वतीनं महाराष्ट्र भूषणच्या धर्तीवर गत वर्षीपासून 'उद्योगरत्न पुरस्कार' देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व उद्योगमंत्र्यांच्याहस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले होते.
महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार साहित्य, कला, क्रीडा आणि विज्ञान या क्षेत्रामधल्या अलौकिक कामगिरीसाठी प्रदान करण्यात येतो. त्याच धर्तीवर उद्योगक्षेत्रातील योगदानासाठी आता 'उद्योगरत्न पुरस्कार' देण्यात येत आहे.
महाराष्ट्र शासनाचा हा पहिला उद्योगरत्न पुरस्कार रतन टाटांना देण्यात आला होता. राज्य शासनाने या पुरस्काराचे नाव बदलवून उद्योगरत्न रतन टाटा असं ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज याबाबत निर्णय घेण्यात आल्याची माहिती राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. रतन टाटांना राज्य शासनाकडून अशा रितीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं.
मुंबई येथे जे उद्योग भवन बनत आहे,त्यालाही रतन टाटा यांचे नाव देण्यात येणार आहे. नवीन उद्योग भवन हे 700 कोटींचे होत आहे, याला नाव देऊन एक प्रकारे शासकीय श्रद्धांजली वाहण्यात आली आहे
मला शालेय जीवनापासून वाटायचे की रतन टाटा याना भेटावं, पण गेल्यावर्षी जो पुरस्कार जाहीर झालं, त्याचे पत्र देण्यासाठी मी गेलो होतो, असे उदय सामंत यांनी सांगितले.